व्यथा 17:19 सुजित बालवडकर 1 Comments Category : मिलिंद फणसे , मिलिंद फ़णसे मी गुन्हे अक्षम्य केले ही खरी आहे व्यथात्यांसही तू माफ केले ही खरी आहे व्यथावाट मी चुकलो कितीदा, सांगती जे जे मलाकाननी त्यांनीच नेले ही खरी आहे व्यथा
घे तुझ्या बाहूत 17:08 सुजित बालवडकर 0 Comments Category : मिलिंद फ़णसे , मिलिंद फ़णसे घे तुझ्या बाहूत शीतल, त्या जगी पोळून आलोदे विसावा माय गंगे, राख मी होवून आलोही न वसने आवडीची, क्लेशदायक बंद ज्यांचेरेशमाचे पाश ज्याचे वीण ती उसवून आलोसाथ अंबर, साथ तारे जे अनंताचे इशारेमर्त्य, चकव्या सोबत्यांची साथ मी सोडून आलोस्फुंदणाऱ्या लेखणीला सत्य हे सांगू कसे कीकोरडी झालीस तू अन् मी रिता होवून आलोशब्दही देती दगा का, भृंग, ब्रह्मास्त्राप्रमाणेशाप कोणा भार्गवाचा का शिरी घेवून आलो ?- मिलिंद फ़णसे