कष्ट तू अपार दे
11:14 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
झेलण्या उभार दे !
सोसवेल तेवढा
तू खुशाल भार दे !
मनातला मोर
16:46 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
मोर होता जगत आयुष्य संथ /
उत्तम सुरु होता त्याचा प्रपंच पंथ //१//
मनातला मोर / मनातला मोर //
मोर होता धावत डोंगर पार करत दूर /
तुझ्यामुळे सापडले त्याला ताल आणि सूर //२//
क्षणात
19:15 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी , सुधिंद्र देशपांडे
तुझा म.क.सं. संकेतस्थळ पाहिलं... रोज वाचतही असतो...
मराठी कवितेंसाठीचं हे तुझ काम खुपच आश्वासक अणि नव्या कवींना उर्मी देणारं आहे..
खुप खुप धन्यवाद अणि अभिनंदन...
हे संकेतस्थळ एवढं देखणं आहे की माझ्या काही कविता इथे असाव्यात असा मोह होतो आहे.
त्यासाठीसुध्दा हा पत्रप्रपंच...!! एक कविता सोबत देत आहे. आवडल्यास नक्की कळविणे.
क्षणात होते जांभ गुलाली
क्षणात सांज का लाल दिसे
क्षणात दाटे अबीर भोवती
क्षणात चांदणपूर असे
प्रिय सर्दीस
17:08 सुजित बालवडकर 1 Comments Category : नवकवी
वसंत ही निष्पर्ण आता
15:26 सुजित बालवडकर 1 Comments Category : नवकवी
शिशिराचे ते भोगच आता आले माझ्या नशिबातही
कशी करावी रुजवण कळेना तुझ्यावाचूनी जगण्याची
कातरवेळी दाटून येते आठव आपुल्या स्वप्नांची !
आसवांनी आज माझ्या
00:52 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
Share on Facebook
आसवांनी आज माझ्या का असे हे बंड केले
भावनांचे कल्लोळ सारे पापण्यांनी कैद केले !
पाळले मीच होते पदरात माझ्या साप सारे
पोसले रक्तावरी जे डंख त्यांचे जहर झाले !
Share on Facebook
काहीही नसताना हाती
आले हे कसले भोग माझ्या माथी
खायला अन्न नाही
प्यायला पाणी नाही
राहायला घर नाही
घालायला कपडे नाही
Share on Facebook
काहीही नसताना हाती
आले हे कसले भोग माझ्या माथी
खायला अन्न नाही
प्यायला पाणी नाही
राहायला घर नाही
घालायला कपडे नाही
ऐक पावसाची धून
00:32 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
Share on Facebook
ऐक पावसाची धून येता आभाळ भरून
सुसाट या वाऱ्यावर येते आठव फिरून
कोसळता मेघमाला आले डोळे ही भरून
तुझ्या सवे भिजलेली ती सांज येई परतून ,
शब्दांशी खेळता खेळता
17:56 सुजित बालवडकर 2 Comments Category : नवकवी
का, कश्या, कुणास ठाऊक प्रसव-वेदना कुठून आल्या
कवितेला वाढवता वाढवता एक मात्र लक्षात आले
शब्दांनीच शब्दांसाठी कवितेला ओटीत घातले ,
तिने काळीज देताना
17:11 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
Share on Facebook

तिने काळीज देताना… उसासे. मंद टाकावे
रित्या ओंजळीला भावनांचे भार ते द्यावे..
तुझ्या त्या… लोचनांनी तीर वर्मीच सोडावे…
पुन्हा जन्मून जखमा प्रेम त्यातून सांडावे..
लिहिले काय भाळी या कुणा मी योग्य पुसावे..
तुझ्या रेषात हाताच्या मी माझे भाग्य शोधावे.
नात्यांमधले बंध अनामिक
17:10 सुजित बालवडकर 1 Comments Category : नवकवी
Share on Facebook
नात्यांमधले बंध अनामिक
मला उमजले असे अचानक
तटस्थ जरी तू या वळणावर
परतुनी येशील नकळत अवचित,
अभिसारीका तुझ्या मनीची
व्हावे मीच ही आस जीवाची
उपाशी फक्त माऊली ती
18:41 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
Share on Facebook

घेतला अखेरचा श्वास
उरले हाती काय होते
खांद्यावरून जाताना हि
पोळले माझे पाय होते
भाऊ होता पुढे
मागे आप्त होते
प्रेत माझे तरी
का अलिप्त होते .....
रजिस्ट्ररड कविता
15:53 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी

कविता करणार नाही आता ?
का ?
चोरतात म्हणून?
रजिस्ट्रेशन केल्याशिवाय नाहीच ?
अस्स का?
बर मग कसं करशील?
म्हणजे नक्की कश्या कश्याच करशील?
स्वरांचं ?
व्यंजनांच?
की शब्दांच ?
चिमूटभर सुखासाठी आयुष्यच दु:खाकडे गहाण का ?
शिशिरातल्या पानगळी शिवाय वसंत तरी फुलेल का ?
ऋतू सुद्धा बदलले जेथे नाते तरी आता टिकेल का ?
देव चुकला वाटतो
17:04 सुजित बालवडकर 1 Comments Category : नवकवी

जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो गणगोत इथला परकाच वाटतो.
लाचार हे आयुष्य बेकार मज वाटतो कण्हत रोज जगणे आता नकोवाटतो .
मी चाललोय प्रवासी तो रस्ताच चुकीचा होता मुक्काम जे लाभले तो गाव अनोळखी वाटतो .
आधार मी शोधला ते घर बंदिस्त होते अंधारात मी एकला छप्पर अपुरा वाटतो .
अस्वस्थ या वाटा अन मी मुसाफीर नवखा भेटला जो सोबती तो हि घातकी वाटतो .
आयुष्य माझे मला शत्रु समान झाले आयुष्य वाटताना देव चुकला वाटतो
- अमित अंजर्लेकर
मी नाश होणारे, धुम्रवलय निमिषात
21:34 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी

मी भरकटलो वा धडपडलो
हात द्याया कुणीच नव्हते
कुणी असावे सोबत
असेही मुळीच नव्हते
कुणासाठी काही जपलेले
असे स्वप्नही काही नव्हते
आणि जे पाहिले स्वप्नी
ते या जगात काहि नव्हते !!!
माझा गुंजारव
21:28 सुजित बालवडकर 1 Comments Category : नवकवी

मी पाकळ्यांच्या आड दडुनी
उगा पाहिले तिजला
माझ्या सौम्य गुण-गुणीतही
काळा मेघ गरजला
मी लपलो काट्यांच्या मागे
दंश त्यांचे घेत विखारी
ती फुलराणी सावलीतली
धुंदावल्या दिशांना
16:35 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
मी शोधते किनारी पाऊले वाळूत ओली
गंधात केतकीच्या धुंदावलास तू ही
गोडी मलाही कळली अधरातली ही ओली,

