अजून उजाडत नाही गं
16:30 सुजित बालवडकर 2 Comments Category : संदिप खरे

अजून उजाडत नाही गं, नाही गं॥
दशकांमागुन सरली दशके
अन् शतकांच्या गाथा गं,
ना वाटांचा मोह सुटे, वा
ना मोहाच्या वाटा गं,
पथ चकव्याचा गोल सरळ वा
कुणास उमगत नाही गं,
प्रवास कसला फरफट अवघी,
पान जळातुन वाही गं॥


