हस्तांतर
01:45 सुजित बालवडकर 1 Comments Category : द. भा. धामणस्कर

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती जड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.
नास्तिक
22:10 सुजित बालवडकर 1 Comments Category : द. भा. धामणस्कर

माणसांचे संघटित क्रौर्य पाहून
त्याच्या डोळ्यांत पाणी आले;
त्यांच्या उथळ ज्ञानाने तो व्यथित झाला
आणि त्यांच्या मूर्ख श्रद्धांनी त्याला
खराखुरा दैवी मनस्ताप दिला...
मग, त्याने हृदयातील सारी कणवच
हृदयासह फुंकून टाकली एका
सतत जागणार्या मेंदूच्या मोबदल्यात; आणि
हातातील बुद्धिवादाचा दंडुका परजीत तो
आव्हान देत सुटला धर्मग्रंथातील
निर्दय ईश्वरी सत्तेला...
पानं
00:41 सुजित बालवडकर 0 Comments Category : द. भा. धामणस्कर
पानं फाटलेली: वार्याचे
सारे अतिप्रसंग सहन केलेली.
पानं भुईवर विखुरलेली : झाडानेच
अपरात्री घराबाहेर काढलेली.
समुद्राविषयी
23:44 सुजित बालवडकर 0 Comments Category : द. भा. धामणस्कर
सर्व नद्या, इच्छा असो-नसो,
समुद्राला मिळतात. त्यांच्या
निमुट आसवांनी सारा समुद्रच
खारट करून टाकलेला.
साधना
23:37 सुजित बालवडकर 0 Comments Category : द. भा. धामणस्कर
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे….तरीही पक्षी
कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही…
परिपक्व झाडे
23:34 सुजित बालवडकर 0 Comments Category : द. भा. धामणस्कर
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …
