अजूनी वाट एकाकी गं
17:43 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुधिंद्र देशपांडे
अवसेची ही रात उजळते, अंधाराच्या वाती गं
शोधित फिरते सुर्य उद्याच्या, अजूनी वाट एकाकी गं ॥ धॄ॥
सुर्य लोपता, अवतीभवती विश्व काजळी उरते गं ।
कशी शांतता यास म्हणू, हे वेध वादळी भलते गं।
लाटांवर भिरभिरते नौका, अणि किनारा नाही गं ॥१॥