... जेंव्हा "निष्पापपणा" हा स्वाभाविक असायचा... ... जेंव्हा "पिणे" म्हणजे फक्त रसना असंच माहित होतं... ... जेंव्हा "बाबा" हे एकमेव हिरो वाटायचे.. ... जेंव्हा "प्रेम" म्हणजे आईची ती मिठी/ झप्पी असंच माहित होतं... ... जेंव्हा "बाबांचे खांदे" म्हणजे जगातील सर्वात उंच गोष्ट वाटायची... ... जेंव्हा "वाईट - शत्रु" म्हणजे आपली खट्याळ भावंडं वाटायची...
प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं बायको झाल्यापासून भांडणे खुप वाढली आहेत, संसाराच्या वृक्षावरील हिरवी पाने पार झाडली आहेत,, उरला आहे तो फ़क्त पालापाचोळा…
आजकाल इथं आम्ही दोघंच असतो.. माझा एकांत आणि मी. आजकाल तसं दुस-या कुणाशी फारसं पटत नाही.. तासन तास दोघं बोलत बसतो, निश्चल अंधाराच्या काठाशी, कधी मनात जपलेल्या वाटांशी..
ज्या जमावात त्याने मित्र शोधून घेतले खरे म्हणजे जे मिळाले त्यांचा त्याने स्वीकार केला [!] त्याच्या ओंजळीतील शब्दाच्या फुलांचा वास त्याना घेऊ दिला ! मग त्यांनी का नाक बंद करून घेतले ? अचानक !!
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ..?? आमच्या लहानपणची घरे जशी होती तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक.? माडीवरचे बळद कितीतरी जुने असावे पुसलेच जात नाही मनातून
मी वेगळ्या लहरीत कविता करतो तुम्ही वेगळ्याच लहरीत कविता वाचता मी माझे विचार कवितेत भरतो तुम्ही तुमच्या जिवनाशी संदर्भ शोधता मी माझ्या स्वार्थासाठी कविता करतो तुम्ही कवितेला तुमचा अर्थ देता
एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं… असा वाटण्याची जागा मग, मूल झालं की… मोठं घर झालं की… अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते. दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.