सूर जाहला ईश्वर
सूर जाहला ईश्वर
शब्द झाले मायबाय
गीत उच्चारू लागले
मंत्रभारला उ:शाप
देह आटला लयीत
प्राण दाटला तालात
आज फाटक्या झोळीत
दान पडले अमाप
सात सूर सात जन्म
एक गाणे पूर्णब्रह्म
जन्म जन्म जोडणारा
घेत आहे मी आलाप
सूर बैराग्याचा रंग
सूर निर्मोही नि:स्संग
शून्य झाले देणे घेणे
काय पुण्य.... काय पाप
कवीः वैभव जोशी
चित्रपट - पाउलवाट
मूळ दुवा - http://paulwaatthefilm.com/song
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
0 अभिप्राय