मराठी कविता संग्रह

बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग

19:08 Sujit Balwadkar 10 Comments Category :


आई आई ये ना जरा... बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग !

बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
आळीमिळी गुपचिळी... पडलेला वारा !

हले नाही... डुले नाही... जणू काही फोटो
आवाजही त्याला माझा लांबूनच येतो !

उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजूनच कसनुसा दिसे !

विचारले- "बाबा, काय पाहतोस सांग?!'
बघे म्हणे- "आभाळाचा लागतो का थांग-

काय सांगू पोरी तुला कळणार नाही
आभाळ न आले हाती; जमीनही नाही !

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr


चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा
हाती नाही काम; गाडा चालायचा कसा !

घोडा झालो तरी काही शिकलोच नाही
विकायच्या जगामध्ये टिकलोच नाही

आणि मग उठुनिया कुशीमध्ये घेतो
ओले डोळे पुसुनिया ओली पापी घेतो...

घाबरतो जीव; बाबा असे काय बोले?
चित्रातले रंग त्याच्या जसे ओले ओले...

चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कुठे गेला ?
हसणारा बाबा कुणी पळवून नेला?....

आई आई ये ना जरा बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग....!!

- अग्गोबाई ढग्गोबाई २, संदीप खरे

Image courtesy: संदिप खरे

संदिप खरे यांच्या इतर कविता -

  1. ब्लँक कॉल

  2. मैखाना

  3. तो प्रवास कसला होता

  4. प्रलय

  5. हसलो म्हणजे

RELATED POSTS

10 अभिप्राय