काय झाले
आसवांचे, यातनांचे, पाखरांचे काय झाले?
पेटलेल्या पिंजर्याचे, वादळांचे काय झाले?
वाळवंटाचा प्रवासी केवढा हैराण झाला!
चालताना हे अचानक मृगजळांचे काय झाले?
नेमके ते काय होते जे तुझ्या ओठी न आले
जन्म ज्यांचा अंत होता, त्या कथांचे काय झाले?
शेवटी ते युद्ध होते... शेवटी युद्धात सांगा
कौरवांचे काय झाले? पांडवांचे काय झाले
पत्थरांच्या कोणत्या शहरातला मी राहणारा,
माझिया पदारातल्या फुलपाखरांचे काय झाले?
- अनामिक
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
4 अभिप्राय
mi hi kavita Print karun pradarshit karu shakto kay?
ReplyDeleteमाहिती नाही. कारण हि कविता माझी नाही आणि मला कवीचे नावही महिति नाहीये, म्हणुनच मी कवितेखाली अनामिक असं लिहिलयं.
ReplyDelete- सुजित
अनामिक हा कुणी एकच कवि आहे का ? या सा-या कविता त्याच्याच आहेत का ?
ReplyDeleteनाही. मला कवीचे नाव महिति नाहीये, म्हणुनच मी कवितेखाली अनामिक असं लिहिलयं.
ReplyDelete- सुजित