मराठी कविता संग्रह

मराठी शायरी

02:29 सुजित बालवडकर 48 Comments Category : ,

वेदना भरपुर इथे अन,
अमाप दुःखे रडण्यासाठी
सहजच मिळतील हजार जागा
एकांतामधे कुढण्यासाठी
तरीही आहे आज इथे मी
मैफ़िलीस या हसविण्यासाठी

---------------------------

एवढ्यात तिरडी उचलु नका थोडं अजुन हसु द्या मला
लगेच चिता पेटवु नका थोडं अजुन जगु द्या मलाती येईलच इतक्यात जरा एकटयाला पडु देत मला
माझ्यासाठी तिला रडताना डोळे भरुन पाहु द्या मला
---------------------------

पचवुन पाप सारे आम्ही पवित्र असतो
यादीत भेकडांच्या आम्ही पुढेच असतो
गणतीत मानवांच्या आम्ही कधीच नसतो
वस्तीत माणसांच्या आम्ही पशुच असतो
--------------------------

शौर्य कोणा काय सांगु लढलो कधीच नाही
जगण्यातील मौज सांगु ऐसे कधी जगलोच नाहीऐकण्यात जन्म गेला स्वतःस आम्ही ऐकलेच नाही
चोर आम्ही कोणा म्हणावे परके कुणी दिसलेच नाही
-----------------------------------

कोण तो मृत्युच का
आम्हास आला न्यावया
ठेवलाहे प्राण सज्ज
आम्ही तयाला द्यावया
चल निघुया लोक जमतिल
अश्रु कोरडे ढाळावया
बागेतील अमुच्या फ़ुले तोडतील
प्रेतावर अमुच्या वहावया
--------------------

पाहिले हजार सोहळे
ऐसा न सोहळा पाहिला
लाथाडले आजन्म ज्यांनी
प्रेतावर माझ्या एक अश्रु ढाळिला
---------------------------

मरणास कोण डरतो
आहेच तेही यायचे
स्वतःस मी बजावतो
तेव्हा तरी हसायचे
----------------------------

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही |
-------------------------------

जन्मभर अश्रुस माझ्या शिकविलेस नाना बहाणे,
सोंग पण फ़सव्या जीण्याचे, शेवटी शिकलोच नाही
--------------------------------

मृत्यु म्हणाला येऊ का ?
मी म्हटलं आत्ताच ये
कायम एकटाच जगलो
तु तरी सोबतीला ये
----------------------------------

ही व्यथा माझीच आहे अन दुःखही माझेच आहे
ओघळले गालावरती रक्त ते माझेच आहे
शब्दही माझेच अन वेदनाही माझीच आहे
पिळवटुन ह्रुदय आली शायरी ती माझीच आहे
----------------------------------

बेभान वा-यावर जरा ढळला पदर तिचा
पाहिले आम्ही अन आम्ही बेहोष झालो
ऐसे नव्हे की आम्हा दिसलेच काही
पाहुन बेहोषी तिची आम्ही बेहोष झालो
----------------------------------

प्यायलो थोडीच आम्ही बहकलो भरपुर होतो
वाटले बेभान नाचु पण रडलो मनसोक्त होतो
वहावलो भरपुर तरीही उरलो कोरडेच होतो
जगलो कळपात आम्ही राहिलो एकटेच होतो
--*------------------------

मरणास थांब सांगु आहोत आम्ही ऐसे बिलंदर
करण्यासही काही ना उरले जगलोत आम्ही इतके कलंदरआम्ही उधळले आयुष्य अवघे मग आजन्म अश्रु ढाळले
दुःख इतकेच की उधळले सारे जयांवर त्यांना कधी ना उमजले
--------------------------------

चाखली मद्ये अनेक, पण प्यायलो डोळ्यांतुनी
ती नशा न्यारीच होती
मग धावलो देवाकडे, ती नशा उतरु नये
मागणी इतकीच होती


-अनामिक

RELATED POSTS

48 अभिप्राय

  1. शब्द अंतरीचे असतात, मात्र दोष जिभेला मिळतात.
    मन स्वतःचे असते, मात्र झुरावे दुसऱ्यासाठी लागते.
    ठेच पायाला लागते,
    मात्र वेदना मनाला होतात, डोळ्यांना रडावे लागते.
    हेच खरे मैत्रीचे नाते असते.

    ReplyDelete
  2. ~~ मैत्री ~~
    भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
    की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
    मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
    ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ”

    ReplyDelete
  3. ~~ मैत्री ~~
    भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
    की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
    मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
    ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ”

    ReplyDelete
  4. शब्द अंतरीचे असतात, मात्र दोष जिभेला मिळतात.
    मन स्वतःचे असते, मात्र झुरावे दुसऱ्यासाठी लागते.
    ठेच पायाला लागते,
    मात्र वेदना मनाला होतात, डोळ्यांना रडावे लागते.
    हेच खरे मैत्रीचे नाते अस

    ReplyDelete
  5. ~~ मैत्री ~~
    भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
    की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
    मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
    ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ”

    ReplyDelete
  6. Koni konacha nasto sati dehachi antim hote mati aapnch aaple sobti
    tar kshal havi ti khoti nati

    swapnil

    ReplyDelete
  7. madhav khatke13/08/2010, 03:41

    kharya arathane jo "JIVAN" jagto toch ha anubhav gheu shakto. khare sangu ka ya sathich deo apnas manushya yoni deto, ABHINANDAN.

    ReplyDelete
  8. tumchya kavita khup chan aahe mala far aavdlya

    ReplyDelete
  9. प्यायलो थोडीच आम्ही बहकलो भरपुर होतो
    वाटले बेभान नाचु पण रडलो मनसोक्त होतो
    वहावलो भरपुर तरीही उरलो कोरडेच होतो
    जगलो कळपात आम्ही राहिलो एकटेच होतो

    ReplyDelete
  10. ~~ मैत्री ~~
    भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
    की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
    मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
    ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ

    ReplyDelete
  11. Happiness cannot b ownd,earnd,worn r consumed.Happiness is a spiritual experience of livng evry min vth love,grace n gratitude.Gud day!

    ReplyDelete
  12. दीपक10/10/2010, 21:08

    बेभान बरसणारा पाऊस नाही मागत तुझ्याकडे, एखादा ओघळणारा थेंब तरी दे...
    सुसाट वाहणारा वारा नाही मागत तुझ्याकडे, मंद झुळुक तरी दे...
    मूठीएवढे ह्रदय नाही मागत तुझ्याकडे, दोस्तीसाठी चुकणारा ह्रदयाचा ठोका तरी दे...
    अन् काहीच जमणार नसेल तुला,तर आयुष्यभराची दोस्ती तरी दे...!

    ReplyDelete
  13. शब्द अंतरीचे असतात, मात्र दोष जिभेला मिळतात.
    मन स्वतःचे असते, मात्र झुरावे दुसऱ्यासाठी लागते.
    ठेच पायाला लागते,
    मात्र वेदना मनाला होतात, डोळ्यांना रडावे लागते.
    हेच खरे मैत्रीचे नाते असते.

    ReplyDelete
  14. tumi khaup mana parus lihita.mala te aavdale.

    ReplyDelete
  15. tumchya shayri far good ahet mala far avdlya

    ReplyDelete
  16. Bhavna Khup chnagalya Ahet,,,,,,,,,,,,

    ReplyDelete
  17. dhananjay patil28/01/2011, 17:27

    khup khup sundar

    ReplyDelete
  18. insargala rang hava asto
    fulaala gandh hawa asto
    manus hi ekta ksa rahnar
    tyalahi premaca chand hawa asto

    ReplyDelete
  19. Rajendra Gaikwad29/05/2011, 23:12

    Shaayari damadar itaki ki
    pyayachehi visarun jave!

    ReplyDelete
  20. kharach khupach chan aahe tumchya shayari

    ReplyDelete
  21. konavarahi prem karne ha vedepana,
    kunitari aaplyavar prem karne hi bhet
    aani aapan jyachyavar prem karto tyane
    aaplyavar prem karne mhanje "nashib"

    kharach na...........

    ReplyDelete
  22. MANGESH (RAAN WARA)12/10/2011, 18:39

    MALA KHUP AWDTE MARTHI KAVITA

    ReplyDelete
  23. Amol Kholgade24/10/2011, 21:52

    मला ही जिंदगानीची नशा आता पुरे झाली,
    जराशा झिंगण्यासाठी कधी मी पीतही नाही

    ReplyDelete
  24. Dost dosti kar magar pyar se

    ReplyDelete
  25. very good..............................................Rahul Kadam

    ReplyDelete
  26. maran darashi aal. aan mhanal ki tula shamber varshe aayushha..
    maran vicharat padal....

    ReplyDelete
  27. Vikas Tayade23/12/2011, 21:23

    bahot smart ho aap

    ReplyDelete
  28. TUMCHI KAVITA MALA FAR FAR AVDLYA.

    ReplyDelete
  29. MANACHA THAKAVA JATO.LAY BHARI

    ReplyDelete
  30. lagna adhi khup sahitya sammelan arrange kele kahi kavitahi lihilya. khup varshani blog war vachun junya athwani tajya zalya,gazal kavita apratim watlya. thanks

    ReplyDelete
  31. prasad vasant joglekar08/09/2012, 18:42

    laji lagan

    ReplyDelete
  32. Ganesh bhalekar11/09/2012, 07:30

    काही आठवणी विसरता येत नाहीत,
    काही नाती तोडता येत नाहीत., मानस दुरावली तरी मन नाही दुरावत,
    चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

    ReplyDelete
  33. Ganesh bhalekar11/09/2012, 07:33

    तु म्हणजे एक स्वप्न,भल्या पहाटे पडणारे,
    तरीही खोटे ठरणारे,मनात दडुन ठेवलेले,
    कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे

    ReplyDelete
  34. Ganesh bhalekar11/09/2012, 07:34

    कुणाचेच नसतात हक्क कुणावरपण तरीही डोळे भरतातच ना?
    "अपेक्षाच करू नये अश्या"पण अपेक्षा तरीही उरताताच ना?

    ReplyDelete
  35. Ganesh bhalekar11/09/2012, 07:35

    डोळ्यांतुन ओघळलेला थेंबमाझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
    तो रुसलेला ओला रुमाल..पाऊले मागे फिरताना हसला होता

    ReplyDelete
  36. Ganesh bhalekar11/09/2012, 07:35

    श्वासाला तुझ्या होते,ते उसास्यांचे भास नव्हते,
    तुझ्या श्वासात मिसळलेले,सख्या ते माझे श्वास होते

    ReplyDelete
  37. Ganesh bhalekar11/09/2012, 07:36

    वेडं हे मन माझे तुझी वाट पाहणं सोडत नाही
    तू परत कधीच येणार नाही कदाचित त्याच्या मनालाही हे पटत नाही

    ReplyDelete
  38. Ganesh bhalekar11/09/2012, 07:37

    !!! काही दोन पावलेच चालतात, आणि कायमची लक्षात राहतात,
    काही साथ देण्याची हमी देऊन, गर्दीत हरवून जातात....... !!! 9anesh!...

    ReplyDelete
  39. Ganesh bhalekar11/09/2012, 07:37

    देईन तुला सुख सारे नाही याची देत हमी
    पण प्रेमात नाही राहणार कधी कोणतीही कमी
    तुझी साथ नशिबात असो किंवा नसो
    पण पाहवेना मला तुझ्या नयनात नमी
    तुझ्या खुशीतच माझी ख़ुशी

    ReplyDelete
  40. Ganesh bhalekar11/09/2012, 07:38

    वाटतं तुझ्या आयुष्याच्या वाटेवर सर्वत्र पसरली मखमल असावी
    चुकून एखादा काटा कधी रुतला तरी वेदना फुलाहून कोमल असावी

    ReplyDelete
  41. Rahul Singanjude08/10/2012, 18:21

    Kiti chan lihita boss tumhi....!!!

    Apratim...!!!

    ReplyDelete
  42. पाटील प्रियांका पांडुरंग30/11/2012, 17:12

    खूप छान मस्तच

    ReplyDelete
  43. मुंबई माझा जिल्हा
    ठाणा माझा तालुका
    कोपरखेरणे माझा गाव
    .........वर प्रेम करतो
    मयूर भाई माझे नाव

    ReplyDelete
  44. आध घर माध घर
    माध घरावर खाट
    खाटवर उशी
    उशीवर ठुशी
    ठूशीवर ग्लास
    ग्लासात घड्याळ
    घड्याळात वाजला एक
    मी..........लेक

    ReplyDelete
  45. [...] मराठी शायरी | मराठी कविता संग्रह [...]

    ReplyDelete