मराठी कविता संग्रह

जगायास तेव्हा खरा अर्थ होता

01:43 सुजित बालवडकर 2 Comments Category :



जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थास ही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे

नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पहायचे

उदासी जराशी गुलाबीच होती, गुलाबात ही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता, नभाला किती खिन्न वाटायचे

असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पवसाळे नवे व्हायचे
ऋतुंना ऋतुंनी जरा भागिले की नव्याने जुने झाड उगवयाचे.

मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मना भोवती चंद्र नव्हता तरीहि मनाला किती शुभ्र वाटायचे.

आता सांज वेळी निघोनी घरातून दिशहीन होउन चालायचे
आता पाऊलेही दुःखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे.

- सौमित्र

हि कविता कवी सौमित्र (किशोर कदम ) यांनी " खुपते तिथे गुप्ते " या कार्यक्रमात सादर केली होती.


Image courtesy: BG Limaye


आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.


अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

2 अभिप्राय

  1. Kavita chhan ahe. Sundar kavita vachlyavar vatt, ayushya kiti sundar ahe, ani te fakt kavita vachnyatch ghalvav. Sundar gard vanrai t zadavar zopala bandhava ani tya zopalyavar halke zoke ghet kadhi nuste relun fakt kavitach vachavyat. Vvaa kiti chhan kalpana ahe..

    ReplyDelete
  2. का होतसे हे ओझे माथ्यावरी नभाचे
    हलकेच भासती सारे ते जोगवे व्यथांचे
    जखमां ही या सुगंधी का खेळ हे मनाचे
    फुलांचे ही झेल ना सहावे प्रारब्ध ओंजळीचे ……।

    ReplyDelete