मराठी कविता संग्रह

कधी हसत खेळत . . .

16:31 सुजित बालवडकर 0 Comments Category :

कधी हसत खेळत, कधी रुसत फसत
लय शोधत चालले गाणे
कधी कधी गुणगुणत, कधी मौनात रमत
दिशा जोडत चालले गाणे

कधी उन्हांच्या, कधी घनांच्या गावी जाता जाता
जाता जाता सूर मिसळती हिरव्या पाऊलवाटा
वाटा अधिर्‍या, पाऊल आतूर, स्वप्न उभे क्षितिजावर
क्षितिजावर थांबून जरासे नभ घ्यावे हातावर

सात रंगांना सतत, सात स्वरात शोधत
दाद मागत चालले गाणे
कधी कधी गुणगुणत, कधी मौनात रमत
दिशा जोडत चालले गाणे

चार क्षणांचा प्रवास सारा, आभासांची वळणे
मुशाफिरीचा कैफ मनावर, ओठी स्वैर तराणे
नित्य नव्या वळणावर भेटे मैफल एक नवेली
तार जुळेतो विरु लागती श्वासांमधल्या ओळी

कधी स्वच्छंदी आलाप, कधी अबोल विलाप
चाल चालत चालले गाणे
कधी कधी गुणगुणत, कधी मौनात रमत
दिशा जोडत चालले गाणे

कवीः वैभव जोशी
चित्रपट - पाउलवाट

मूळ दुवा - http://paulwaatthefilm.com/song



अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

0 अभिप्राय