मराठी कविता संग्रह

माय - स.ग. पाचपोळ

01:26 सुजित बालवडकर 10 Comments Category : ,

[फॉरवर्डस मधून आलेल्या एका ईमेलमध्ये खालील कविता मिळाली. मूळ फॉरवर्डमध्ये नारायण सुर्वे कवी असल्याचा उल्लेख केला गेला होता. पण प्रणव प्रियांका प्रकाशा ह्या तरुण, जाणकार कवींनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार स.ग.पाचपोळ हे मूळ कवी आहेत. त्याप्रमाणे बदल करत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की जितेंद्र जोशी ह्यांनी देखिल एका कार्यक्रमात ही कविता सादर करताना मराठी कवीचा उल्लेख "नारायण सुर्वे" असाच केला आहे.]


हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍

RELATED POSTS

10 अभिप्राय

  1. bhavanatmak kavita aahe.

    ReplyDelete
  2. Prashant Bhopale06/04/2010, 17:12

    Lay bhari 1 number

    ReplyDelete
  3. EKDAM ZAKKAS....MOJKYACH ASHA KAVITA ASTAT KI JYA HRUDYALA BHIDTAT.....

    ReplyDelete
  4. mala hi kavita far aawdali. Kay kavita lihili aahe Narayan Surve ni ! Pan mala kalale ki hi kavita hindi kaviteche bhashantar ahe. jannyachi ichha ahe ki hindit hi kavita koni lihiki ahe?

    ReplyDelete
  5. nad khula kavita aahe

    ReplyDelete
  6. Avinash Kadam18/08/2010, 08:00

    या कवितेविषयी बराच घोळ घातला गेला आहे. याला कारण जितेंद्र जोशी नावाच्या कुणा गायकाने या कवितेचे मूळ सांगतांना बर्‍्याच थापा मारल्या आहेत. ही कविता मुळात नारायण सुर्वे यांची नाहीच. ती हिंदीतून अनुवादीत झालेली कविताही नाही. मराठवाड्यातल्या पाचपोळ नावाच्या कवीचे हे गाणे आहे. डिसेंबर २००५ च्या धुळे येथील विद्रोही साहित्य संमेलनात हे गाणे विद्रोही शाहीरी जलसा या कलापथकाने सादर केले. त्या नंतर हे गाणे दक्षिण महाराष्ट्रातीत खुपच लोकप्रिय झाले. हे एक लोकप्रिय लोकगीत बनल्याने याच्या कॉपीराईट इ. विषयी कोणी फारशी काळजी घेतली नाही. आता काही गायक हे गाने चोरून त्याच्या सिडीज बनवित आहेत पण दुर्दैवाने या गाण्याच्या मूळ निर्मात्यांना याचे श्रेय देण्याचे बेमालून टाळले जात आहे. असल्या उठवळ व उचल्या लोकांपासून मराठी ब्लॉगवाल्यांनी सावध रहायला हवे. नाहीतर मराठी साहित्याचा सारा इतिहासच खोटा लिहीला जाईल.

    अविनाश कदम, मुंबईसेंट्रल, मुंबई

    ReplyDelete
    Replies
    1. सदर कवी हे मराठवड्यातले नसून विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील sakharkherda या गावचे आहेत

      Delete
  7. मनिष मालुसरे -मला ही कविता खरेच आवडली लाखात एक आहे॰पण कविचा घोळ मिटवणे गरजेचे आहे॰आणि या कवितेच्à07/09/2012, 15:58

    झक्कास

    ReplyDelete
  8. सर
    समाधान पाचपोळ सर हे माझे शिक्षक होते
    विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेरडा येथील एस इ एस कनिष्ठ महाविद्यालय येथे मराठी चे ते प्राध्यापक होते
    आणि त्यांची कविता पाठ्यपुस्तकात छापण्यात आलेली आहे त्याचे श्रेय श्री नरेंद्र लांजेवार , ग्रंथपाल,बुलढाणा यांना जाते,

    ReplyDelete