मराठी कविता संग्रह

प्रलय

16:15 Sujit Balwadkar 2 Comments Category :उगाच काय ग ? छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद
उगाच काय ग ? छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद ? ? ? ?

मी, तू, जगणे, पृथ्वी.. कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही

अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग

अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत

पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत

अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर

अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर

स्पोँसर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदडभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट

थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून

काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने

आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर प्रलय होईल असे काही वाटत नाही

- संदीप खरे

Image courtesy: संदिप खरे

संदिप खरे यांच्या इतर कविता -

  1. मैखाना

  2. तो प्रवास कसला होता

  3. ब्लँक कॉल

  4. हसलो म्हणजे

RELATED POSTS

2 अभिप्राय