मराठी कविता संग्रह

कणा

15:59 सुजित बालवडकर 6 Comments Category :



'ओळखलत क सर माला?' पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन'.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
'पैसे नकोत सर', जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !

- कुसुमाग्रज

Images courtesy: Rahul Bulbule

RELATED POSTS

6 अभिप्राय

  1. Reblogged this on मराठी कविता संग्रह and commented:
    पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा...

    ReplyDelete
  2. खरोखरी छान कविता आहे

    ReplyDelete
  3. छान आहे कविता

    ReplyDelete
  4. Ashwin Taware19/09/2012, 01:03

    hi kavita mhanje jivanacha arth.

    ReplyDelete
  5. vaibhav r pawar13/03/2013, 22:24

    best poem in the world

    ReplyDelete
  6. Jiwan Jagnyala Himmat Denari Kavita

    ReplyDelete