बदला
खेळ मांडू जीवना कुठला तुझ्याशी
जन्म सारा भांडुनी थकला तुझ्याशी
केवढे साक्षीपुरावे आणले पण,
जिंकला ना एकही खटला तुझ्याशी
का सलावा एवढा मजला पराभव
तो सिकंदरही म्हणे हरला तुझ्याशी
मी तसा आहे तुझा सच्चा समर्थक,
सांग मुद्दा कोणता पटला तुझ्याशी
का अता वळणावरी देतोस हाका?
प्रश्न कुठला येउनी सुटला तुझ्याशी
टाळतो आहे मला बदलायचे मी,
घ्यायचा आहे पुरा बदला तुझ्याशी
– अभिजीत दाते
0 अभिप्राय