मराठी कविता संग्रह

शिवप्रताप...

15:34 सुजित बालवडकर 0 Comments Category :

मनस्वी‬
वैतागला आदिलशाह…
कंटाळला ऐकून पराभवाच्या कथा
बोलला दरबारात तो..
मांडली त्याने आपली व्यथा…
बोलला… “कौन है ये सिवा…
एक बच्चा है बस… औकात क्या हैं उसकी?
मेरे एक सरदार का बेटा…
तरीही कसा हा आव्हान देतो,
माझ्या इतक्या मोठ्या साम्राज्याला?
कसा काय हरवू शकतो हा,
माझ्या, भल्या भल्या सरदारांना?”
मागून वदली, गर्जली.. बडी बेगम..
“बहुत हुआ.. अब और नही…

जाकर पकड के लाओ उसे कोई…
नाहीच पाहवत मला आता…
माझ्या साम्राज्याची हार…
थांबवायलाच हवे सिवाला..
करायलाच हवा त्याला ठार…
उचलेल हा विडा… जाईल जो…
आणेल त्या शिवाला किंवा पाडेल त्याचा मुडदा
देईल मी त्यास हवा तो मुलुख
बनवेन आदिलशाहीचा बडा सरदार त्याला… “
एवढे ऐकूनही कोणी सरदार पुढे सरेना…
सिवाला आणतो… मारतो…
म्हणायला… कोणीच धजेना…
बादशाह म्हणाला… सगळ्याच सरदारांना…
“ताज्जूब है…. का घाबरता त्याला. .
वो तो बस एक चुहा है… पहाडो में छुपा हुआ… “
गपगार झालेल्या दरबारातून मग…
गरजला अफझल….. “मै लाउंगा उस सिवा को… “
म्हणाला..
“जातो मीच आणि आणतो
पकडून चिमटीत त्याला...
अलिजा, तुमच्यासमोर… आपटतो..
मिठीच मारतो अशी करकचून
पाहतोच तो चुहा कसा निसटतो…”
बादशाह खुश जाहला… म्हणाला…
“शाब्बास अफझल… तूच खरा मर्द…
तूच माझा बहाद्दूर हाथी…
बाकीच्या सरदारांनी माझ्या
इज्जतीस खिलवलीय माती…
जा.. घेऊन जा फौज… बुलंद तुला हवी तेवढी…
दे आणून मला सिवाची गर्दन तेवढी.. .
चिरडून टाक जहागिरी त्याची
अन फडकावून ये पताका आदिलशाहीची… “
मग निघाला अफझल त्वरेने…
ठरवून भेट शिवरायांशी…
वाटेत होतं चिरडत होता रयत…
खेळण्या शिवबाच्या भावनांशी…
कयास त्याचा असा की
“येईल तो सिवा बाहेर… करेल चढाई..
मारेल मग मीच त्याला…“
अशी मारत होता अफझल बढाई…
शिवरायांनी मात्र दाखविला
संयम भलताच होता
कारण, अफझुल्ल्याचा हाच डाव
त्यांनी क्षणात जाणिला होता..
पोचला अफझल वाईस अन
पाठविला सांगावा वकिलाकरवी….
जावळी दिलीये मला बादशहाने
आलोय ती घ्यायला मी…
यावेस तू शरण अन करावी आज्ञापूर्ती
दाखवावी तुझी श्रद्धा किती…
आदिलशाहीच्या देवावरती….
उत्तर धाडले शिवबाने मग…
" तुम्ही वडिलांचे स्नेही… यावे प्रतापगडी
अन घ्यावा तुम्हीच कारभार हाथी..
मी तर केवळ रक्षक साधा…
तुमच्या जहागीरीची निगा राखतो…
तुम्ही याल.. मला आशिष देण्या…
म्हणून तुमची वाट पाहतो…
पाहून हा आवेश शिवबाचा..
पटली खात्री त्या अफ्झुल्ल्याची…
घाबरलाय सिवा आता…
भेट घेतोच जाउन स्वतः मी त्याची…
अफझल आला… जावळीत उतरला…
पाहिला पायथ्याचा शामियाना…
जाहला स्तिमित तो पाहून वैभव..
शिवबा ‘श्रीमंत' कसा इतुका त्यास उमजेना.. .
भेटीस येताना शिवरायांनी मग
हळूच आणखी डाव खेळला…
मला भीती वाटते तुमची म्हणोनी
शामियान्यात येण्यास उशीर केला..
शिवबाच्या या वागण्याने…
अफझल पुरता फसून गेला..
स्वतःच्या शूरत्वाच्या गर्वात तो…
अगदी अलगद हरवून गेला…
शिवराय आले… नजर भेटली…
अफ्झुल्ल्याने हात पसरले…
शिवरायांनी अलगद सावध
आफ्झुल्ल्याला आलिंगन दिले…
धिप्पाड तो अफझल इतका मोठा
शिवबा त्याच्या कवेत मावले..
हाच क्षण तो इथेच जागा…
म्हणून, आफ्झुल्ल्याने खंजीर उपसले…
मौका समजून आवळले शिवबाला
अन पाठीवर वार केला….
खंजीर घासला चिलखतावर
आणि खरखर आवाज जाहला…
त्याचा कावा जाणताच मग
शिवरायांनी प्रतिहल्ला केला…
आधी वाघनखे खुपसली
अन मग त्याचा कोथळा काढला…
दगा दगा ओरडला अफझल….
क्षणात फाडला अफझल शिवाने
उद्गारला निमिषात सह्याद्री
“याद रख ए दुश्मन…. शिवा सेर है… चुहा नहीं..
ती धगधगती आग आहे… विरून जायला..
वो तेरे चिलम का धुवा नहीं”
“पुन्हा वाट्याला जाशील तर फाडून खाईल…
तुझं हे भलं मोठं साम्राज्य… इतिहास बनून राहिलं….”
- ‎मनस्वी‬

RELATED POSTS

0 अभिप्राय