मराठी कविता संग्रह

विठ्ठला

09:41 Sujit Balwadkar 0 Comments Category :

अभिजीत दाते
अभिजीत दाते
का अजून ही जुनीच वीट विठ्ठला
माग की हिरेजडीत सीट विठ्ठला
हात जोडता इथून पावतोस की
लागतेच दोनदा व्हिजीट विठ्ठला

मी न शेठजी कुणी, व्हिआयपी कुणी
परवडेल का तुझे तिकीट विठ्ठला
भक्तीभाव हीच शक्य देणगी मला
आणखी न कोणती रिसीट विठ्ठला
लागते नवीन नित्य ज्या जगामधे
तू जुना तरी कसा अवीट विठठला
ठेव मग खुशाल हात तू कटीवरी
भक्त होऊ दे अजून धीट विठ्ठला
उगम तुझ्यात वाटतो तुझ्यात अस्तही 
जन्मही तुझीच पायपीट विठ्ठला

- अभीजीत दाते (03-11-2014)

RELATED POSTS

0 अभिप्राय