तुला सोडुन् क्षणात गेलो
उघड्या डोळ्य़ांनी खेळ् हा
पाह्त् मी गेलो,
ओघळत राहीले अश्रु
आणी वाहत मी गेलो,
कसा बाहेर येउ
चक्रव्युहातुन् त्या,
परतीच्या मार्गापासुन
खुप आत मी गेलो.
नियतीची खेळी ही
लक्षात जेव्हा आली,
सुख् सोडुन् दुखाच्या
प्रवाहात मी गेलो
काय होते खरे
आणि काय खोटे,
वदवुन् जे घेतले
ते गात मी गेलो
तुही चार-चव्घात
हसु माझे केले
आपल्यांचाच करीत
घात मी गेलो
संपले आता सर्व आणि
खेळ ही संपला तो
मिटुनी डोळे कायमचे
तुला सोडुन् क्षणात गेलो
0 अभिप्राय