मराठी कविता संग्रह

आताशा

16:25 Sujit Balwadkar 2 Comments Category :

मनस्वी
आताशा फक्त वीजा चमकतात...
गारा काही पडत नाहीत....
आता केवळ ती आठवते...
तिच्यासोबतचे क्षण नाही...

आताशा वाराही सुसाट असतो..
पण, फुलांचा सडा दिसत नाही...
आता, तिचं नाव असंच वाटतं
सोबत भाव उमटत नाहीत....

आताशा चांदणं पिठूर जास्तच
पण, रातराणीचा गंध नाही....
आता ती सामोरी आली
तरीही नजर वळत नाही....

- मनस्वी - Vinayak V Belose

RELATED POSTS

2 अभिप्राय