मराठी कविता संग्रह

प्रिय सर्दीस

17:08 Sujit Balwadkar 1 Comments Category :

मनस्वी

मूळ कवीची माफी मागून...

प्रिय सर्दीस,


.columns {
-moz-column-count: 2;
-webkit-column-count: 2;
}असतेस सोबत तू जेव्हा
नाक गळके गळके होते
रुमालांचेचे भिजती तागे
डोके जडशीळ होते

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही शिंक दिशाहीन होते
अन्‌ मग फवारा उडतो

येतात धारा नाकाशी
मुसमुसून ओढतो मागे
रुमालाशी जोडून नाका
लांबवर फुरका मज भंजाळून जातोहळदीच्या दुधात विरघळणार्‍या
मज आठवती तिखट सुंठीच्या ज्वाळा
फुरफुरी द्वारे श्वास अडाव
मी झोपताना अगतिक होतो

तू सांग आता मज काय
मी करु या चोंदल्या नाका?
झोपताना होई जीव कासावीस
तोंडाने कसाबसा श्वास घेतो.

ना अजून झालो बरा
नाक ना अजूनी मोकळे झाले
मिशांचे होती भाले
रुमाल कितीक स्टार्च झाले.
.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}शब्द आणि चित्र - पंकज झरेकर

RELATED POSTS

1 अभिप्राय