आयडॉल्स
अंगणातल्या झाडावर
काही पक्षी दिसायचे ... निळया डोळयांचे
खिडकीत बसून त्यांना बघताना
मलाच शेकडो प्रश्न पडायचे
कुठे जात असतील, कुठून येत असतील
दिशा चुकत असतील का, पंख थकत असतील का
काय काय अन काय काय
सगळया पंचाईती बंद खिडकीआड बसणाऱ्यालाच !
त्या पक्ष्यांच्या चेहऱ्यांवर मात्र सतत एक शाश्वत उत्तर दिसायचं
त्यांच्या निळया डोळयांत बहुतेक
त्यांचं त्यांचं असं एक
आभाळ असायचं ...
कवीः वैभव जोशी
चित्रपट - पाउलवाट
मूळ दुवा - http://paulwaatthefilm.com/song
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
0 अभिप्राय