स्ट्रगल
अजूनही एखाद्या संध्याकाळी
समुद्रकिनाऱ्यावर
भेटतो मला सूर्य आणि विचारतो....
''आजकाल दिसत नाहीस इकडे, काय चालू आहे सध्या ?''
कॅलेंडरच्या तारखांप्रमाणे
काही उत्तरं बदलली असती तर किती बरं झालं असतं !
''काही नाही जुनाच स्ट्रगल एन्जॉय करतोय ... रोज नव्याने '',
मी पायांवर लाटा घेत उत्तरतो.
मग धास्तावून त्याला विचारतो..
''आणि तुझं ?? तुझं काय चालू आहे सध्या ?''
''माझंही सेम'' तो डोळे मिचकावत म्हणतो.
कॅलेंडरच्या तारखांप्रमाणे
काही काही प्रश्नांची उत्तरं बदलत नाहीत तेच बरंय...!
कवीः वैभव जोशी
चित्रपट - पाउलवाट
मूळ दुवा - http://paulwaatthefilm.com/song
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
1 अभिप्राय
Khup Chan...
ReplyDelete