एक आभाळ नवे
चल उचल पाऊल रान उजळलं सारं
नव्या जोमानं फिरंलं नव्या पहाटचं वारं
येस गाठाया निगाली सुर्व्या देवाची पालखी
शीळ घालत चाललं चार दिशांचं भोईरं
आता आभाळ हवे... एक आभाळ हवे
स्वप्न डोळयांत मावेना, थिटे अंगण भावेना
वेध लागले दिशांचे ... पंख काबूत राहीना
आता आभाळ हवे.... एक आभाळ नवे
मन माझे .... मन माझे .....
सैरभैर सैरभैर भरारीविना
नको नको झाल्या जुन्या पाऊलखुणा
दूरवर माझी नवी चाहूल वाजे
स्वत:स भेटाया मन आतूर माझे
मन माझे ..... मन माझे
चल उचल पाऊल जरी वाट निसरडी
तुझ्या उरात पेटली आस जगण्याची वेडी
खुणावत आहे नव्या क्षितीजाची वेस
नजरेत असूनही दूर थोडी थोडी
तुझ्या स्वागताला उभा तारकांचा गाव
तुझ्या तुझ्या नभावर तुझे तुझे तुझेच नाव
घेउनिया जाते जिथे ललाटाची वाट
सहज सरळ कधी ..... कधी नागमोडी
कवीः वैभव जोशी
चित्रपट - पाउलवाट
मूळ दुवा - http://paulwaatthefilm.com/song
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
0 अभिप्राय