एक अनोळखी फूल
एक अनोळखी फूल
झुले माझ्या वेलीवर
माझे कुतुहल जागे
त्याची नीज अनावर
त्याचे रंग रुप न्यारे
त्याचा गंधही निराळा
तरी पाहूनिया त्याला
दाटे मायेचा उमाळा
कुण्या अंगणाचे ऋण आले कुशीत कुठून
फुटे डोळयांना पाझर, भिजू लागला पदर
गाठभेट नातीगोती
नशीबाचा खेळ सारा
कधी ओल्या चिंब लाटा
कधी कोरडा किनारा
एक नाळ तुटायाला पुरे होतो एक क्षण
एक धागा जुळायाला किती उशीर उशीर
कवीः वैभव जोशी
चित्रपट - पाउलवाट
मूळ दुवा - http://paulwaatthefilm.com/song
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
1 अभिप्राय
Exclant !
ReplyDelete