मराठी कविता संग्रह

प्राजक्तगाणे

15:19 सुजित बालवडकर 0 Comments Category :


माझं मन
फुललं की
माझ्या अंगणातला तो पारिजात लदबदतो.... शब्दांनी.
मग मी तसाच
- हारबीर गुंफण्याच्या भानगडीत न पडता-
ओंजळीत मावतील तितके..
सुटे सुटे शब्द घेऊन
धावत जातो तिच्याकडे
आणि म्हणतो 'माळ तुला हवे तसे'
तर ती हसून माझी ओंजळ
रिकामी करते...आपल्या देहावर...तिला हवी तशी...
मग त्या शब्दांचे होते एक
सुरेल प्राजक्तगाणे... आणि
माझ्या ओठावर
कधी मुखडा.. तर कधी अंतरा !

- जयंत कुलकर्णी

Image Courtesy - जयंत कुलकर्णी

अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

0 अभिप्राय