मराठी कविता संग्रह

विडंबन : सुटे म्हाताऱ्याचे चाळे

14:47 Sujit Balwadkar 3 Comments Category : ,

लोकप्रिय गीत - फिटे अंधाराचे जाळे - गीतकार सुधीर मोघे यांची त्रिवार माफी मागून - या गाण्याचे विडंबन. एका राजकीय नेत्याने - ज्याचे वय आता ७५-८० वर असेल. त्याचा ५ वर्षातील उतरता आलेख. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. सत्ता गेली, इज्जत गेली. पहा ओळखता येते का या नेत्यास.सुटे म्हाताऱ्याचे चाळे, दावले नको ते पाश
सदा गौळणीकडे टाके,. एक हलकट कटाक्ष

श्रेष्टी जागे झाले सारे, मीडिया जागा झाला
पर्व संपता माजोरी, संगे पापाच्या सावल्या
एक अनोखे ग्रहण, लागले नेत्यास नेत्यास (१)

गाव उंडारून झाली, किती रंगाच्या हो राती
राणी नवीन अज्ञात, आला पुत्र तिच्यापोटी
आश्वासानाशी पलटे, जग भकास भकास (२)

झाला तरुण प्रकाश, पेटला पुसाया काळोख
म्हताऱ्याला डीएनएचा, कोर्ट कचेरी आदेश
सारे खोबरे तरी ही नवा प्रवास प्रवास (३)

विडंबन कार - गजाभाऊ लोखंडे
gaja.lokhande@gmail.com

RELATED POSTS

3 अभिप्राय