मराठी कविता संग्रह

श्राद्ध

14:49 Sujit Balwadkar 2 Comments Category :

मोगरा फुलला २०११ दिवाळी अंकात प्रकाशित झालेली माझी कविता पुन्हा सादर.घास ठेवताना म्हंटले काव काव
कावळ्याने सुनावले, गरजेपुरता देता भाव
तिरस्कार वरीसभर, उकीर्ड्यावरी ताव
अपायकारक आरोग्यास, तुम्हालाही ठाव

युनियन मध्ये आमचा, पास झाला ठराव
पितृ पक्षाचा पिरीयड, दुप्पट बढाव
पुण्याई साठी तुमच्या, बोलवी काव काव
मुले मागतात पिझ्झा- चायनीज, ठेवा जरा राव

जाता अनेक ठिकाणी, पोटात होई गडबड
आमंत्रणे घेता घेता, मिळत नसते सवड
विचार करा मागण्यांचा, व्यर्थ नसे बडबड
स्फूर्ती स्थान अण्णा, मागणी आमची सडेतोड

म्हणाल आता, बरेच कि हो फोरवर्ड
पुढील पिढी आमची, रिटर्न OAXFORD
पुढील खेपेस चार्जेस, वी accept क्रेडीट कार्ड
गंभीर जखमी कावळ्यांसाठी, उभारतोय आय सी यु वार्ड

चालू होतेय काव काव काल सेंटर
लावा आगाऊ, टोल फ्री नंबर
देताच आम्ही दगा, फासा डांबर
स्पेशल व्हाईट कलरला, पडती शंभर

वाईट वाटून ,घेवू नका रे बाबा
गेल्यावरच आठवतात, कसे तुम्हा आजोबा
जिवंतपणी माणसाला , हवे असते प्रेम
व्यर्थ सारी मेहनत अन ती सोनेरी फ्रेम

कवी - गजानन लोखंडे

RELATED POSTS

2 अभिप्राय