मराठी कविता संग्रह

काहीतरी तुटतंय

22:30 सुजित बालवडकर 1 Comments Category :

काहीतरी तुटतंय आतून तरीही का अव्यक्त मी
भरलाय बाजार भावनांचा समोरी तरीही का रितीच मी

वेदना ही सुखावते का सांग आता तू तरी
भिजलेल्या नेत्रात तुझ्या शोधते का मलाच मी ,

अबोल होते नाते आपुले स्वप्नामध्येच विणलेले
डोळ्यांतूनी का सांडले तू जे मलाही भावलेले

बंद या ओठांत का रे अडकले ते शब्द सारे
बंधनात त्या मर्यादेच्या मार्ग आता बदललेले ,

विसर आता तू ही सारे गुपित हृदयातच गाडलेले
आठवणींचे मोरपीस ते मनी राहू दे मोहरलेले

स्वप्नांमध्येच जगेन मी ही सात जन्म ते कल्पनेतले
आसवांच्या कुपीतच दडू दे दिवस आपुले मंतरलेले .

- अंजली राणे वाडे : १४ / ३ / १३. वसई .

RELATED POSTS

1 अभिप्राय

  1. Like-काहीतरी तुटतंय आतून तरीही का अव्यक्त

    ReplyDelete