मराठी कविता संग्रह

जर ठरले आहे

17:08 सुजित बालवडकर 1 Comments Category :



जर ठरले आहे तर ते घडणारच
तू ढासळताना मी कोसळणारच!!

अंदाज ढगांचा जर ठाम निघाला
भर ऊन असू दे पाउस पडणारच.!!

शेवट झाल्यावर सुरूवात कशाला?
या सुरूवातीला शेवट असणारच.!!

दोघात असू दे मग लाख दुरावा
कक्षेत सुखाच्या दुख्खे फिरणारच.!!

भर दिवसाढवळ्या जर घडल्या भेटी..
रात्री अपरात्री त्या आठवणारच.!!

अर्ध्या उचकीला जर तो आठवतो..
त्यालाही तेव्हा ठसका बसणारच!!

मी बंद करू का दरवाजा खिडक्या..?
तू आल्यानंतर घर दरवळणारच.!!

- ममता सिंधुताई

RELATED POSTS

1 अभिप्राय