मराठी कविता संग्रह

धुंदावल्या दिशांना

16:35 सुजित बालवडकर 0 Comments Category :

धुंदावल्या दिशांना बिलगून रात्र निजली
मी शोधते किनारी पाऊले वाळूत ओली

गंधात केतकीच्या धुंदावलास तू ही
गोडी मलाही कळली अधरातली ही ओली,

वेचित चांदण्यांना जगलो ही रात्र सारी
जडवून पापण्यांना हसली पहाट वेडी

शृंगार जागताना धुंदी नसांत भिनली
मिठीत साजणाच्या बहरून रात्र गेली,

होता उषेस भारी आपुलाच रूप तोरा
मिठीत भास्कराच्या तृप्तावली रे निशा

जपते जरी तुला मी हृदयात कोंदणी या
कल्पांत ही सुखाचा असता कवेत तुझ्या.

- अंजली राणे वाडे : ०४/०२/१३. वसई .

RELATED POSTS

0 अभिप्राय