मराठी कविता संग्रह

ऋतुचक्र

22:40 Sujit Balwadkar 0 Comments Category :

ऋतुचक्र होते केवळ
नेमस्त दाटले होते
बरसेल जरासे आणिक
थांबेल... वाटले होते
पण काय असे मेघांच्या
डोळ्यांत साठले होते
आभाळ नसावे, बहुधा
काळीज फाटले होते...

- वैभव जोशी

RELATED POSTS

0 अभिप्राय