तू म्हणालास ना
तू म्हणालास ना
म्हणून आता नको बोलूया आपण
या आकाशगंगेवर.
नको बोलूया
त्या तारांगणाची भाषा
तो धूमकेतू, ती उल्का
नकोच त्यांचा उल्लेख
आता कशातही.
ग्रहमालेच्या नियमांना
एखाद्या उपग्रहासारख
सोडून देवूया
जमेल तोवर फिरत राहतीलच ते
आपापल्या कक्षेत.
सूर्य चंद्र तारे
आता वारयालाही
थांबणार नाहीत
इतकी काळजी
नक्कीच घेवूया आपण
निव्वळ तू म्हणालास म्हणून.
आजघडीला
एवढच करू शकते मी
माझ्या कक्षेत राहून.
तसही या पृथ्वीवर
गुरूत्वाकर्षणाचा नियम
कुणाला चुकलाय?
.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}
- ममता सिंधुताई
0 अभिप्राय