मराठी कविता संग्रह

मिसरा

15:31 Sujit Balwadkar 2 Comments Category :आसवांना रोज निचरा लागतो
पण जगाला मीच हसरा लागतो

रंगतो रंगात सा-या शेवटी
सभ्यतेचा शुभ्र सदरा लागतो


वाट कोणी पाहता मरणासही
जीवनाइतकाच नखरा लागतो

भेटतो हसुनी तिला पण बोलता
नेमका डोळ्यात कचरा लागतो

एरवी असते बरी माझी गझल
पण तुझाही एक मिसरा लागतो

– अभिजीत दाते

मूळ दुवा - http://wp.me/p3KYc-5O


अभिजित दाते यांचा पहिला अल्बम

RELATED POSTS

2 अभिप्राय