मराठी कविता संग्रह

प्रेम..प्रेम हेच का असत ,

01:34 Sujit Balwadkar 5 Comments Category : ,

प्रेम..प्रेम हेच का असत ,
त्याला ठेच लागली की तिला दुखत ,त्याला काही होण्याच्या आधी
तिच्या मनाला कळत,
एकमेकांपासून कितीही दूर असले तरीही
मन त्याना जोडून धरत ,
नकाराची चाहुल लागताच
अश्रु डोळ्यांकडे धावत येत ,

कारन अश्रु पेक्षाही ते जास्त जवळच असत ,
आणि तेच अश्रु हळूच
गालावर ओघळत,

त्याच्याशिवाय जास्त कोणीही जवळ नाही
याची जाणीव करून देत ,

त्याच्या विरहात मन कोमेजुन जात,
पण त्याचा सुगंध कायमस्वरूपी
तसाच ठेवत .....

RELATED POSTS

5 अभिप्राय