कितीसे खरे?
श्वासात मिसळला श्वास, असे आभास, कितीसे खरे?
स्पर्शात प्रेमाची आंस, फुलांचा वास, कितीसे खरे?
देवाच्या दारामध्ये ज्यांनी बाजार मांडला त्यांच्या
ह्रुदयात प्रभूचा ध्यास, रोज उपवास, कितीसे खरे?
मनःशांती कसली ती नाही, औषधास नाही सुख
ओंजळीत धनाची रास, दिवाण्-ए-खास, कितीसे खरे?
हुलकावीत क्षणाक्षणाला आयुष्य शिकवीते धडे
लडखडत सोसूनी त्रास, पुन्हा अभ्यास, कितीसे खरे?
कुणी काय कुणाला द्यावे, घ्यावे अन कुणी कसे ते?
हा एकट्याचा प्रवास, आप्त संगास, कितीसे खरे?
- अनामिक
0 अभिप्राय