मराठी कविता संग्रह

हे तिला कळतं नव्हतं....

00:39 Sujit Balwadkar 0 Comments Category :

ति परत त्याची वाट पहात उभी होती...!
गेलेले क्षण आठवतं होती...

तिच्या प्रत्येक अश्रुमध्ये त्याची

प्रतिमा होती...

तिच्या प्रत्येक हाकेत

त्याची दिशा होती...

सुर्याकडे तिच बघणं थांबत नव्हतं.

सांज होत आली...त्याची वाट

पहाता पहाता...

पणं तो काही दिसतं नव्हता.

सुर्य बुडून गेला...ति अशीच उभी तिथे!

सारखं घड्याळाकडे पहायची..एकटक!

सुर्य बूडून गेला होता कधीचं...

घड्याळही चालत होतं...पणं

तिचे गळणारे अश्रु थांबले होते...

हे तिला कळतं नव्हतं.

- (कल्पेश फोंडेकर) १२-११-०७

RELATED POSTS

0 अभिप्राय