क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे सम
क्षितिजाच्या पार वेड्या संधेचे घरटे
वेड्या संध्येच्या अंगणी रात् थरथरते
कुणी जाई दुर तशी मनी हुरहुर
रात् ओलावत् सुरवाट मालवते
आता बोलायाला कोण, संगे चालायाला कोण्
कोण् टाकेल जीवाचे ओवाळुन लिंबलोण्
आता विझवेल दिवा सांज कापरया हातांनी
आणि आभाळाचे गुज् चंद्र् सांगेल् खुणांनी
पड्तील फोडी पुन्हा भरतील् डोळे
पुन्हा पुसतील पाणी हात थरथरते
मनी जागा एक् जोगी त्याचे आभाळ् फाटके
त्याचा दिशांचा पिंजरा , त्याच्या झोळीत् चट्के
भिजलेली माती त्याचे हललेले मुळ्
त्याचे क्षितिजाचे कुळ् त्या चालवते
क्षितिजाच्या पार वेड्या संधेचे घरटे
वेड्या संधेच्या अंगणी रात् थरथरते.....
- संदीप खरे
0 अभिप्राय