मराठी कविता संग्रह

** चाहूल ही कुणाची ?**

18:17 Sujit Balwadkar 0 Comments Category :

कशी पाऊल ठशांची
हिरवळ सजली ?
एकाकी वाटेवरी
संगत ही कुणाची ?
चाहूल ही कुणाची ? चाहूल ही कुणाची ?

कशी अदॄश्य महालाची
कवाडं मोडली ?
कुलूपास तोडणारी
नजर ही कुणाची ?
चाहूल ही कुणाची ? चाहूल ही कुणाची ?

कशी रुसल्या ओठी
चंद्रकोर हसली ?
हुंदक्यांस चुंबणारी
अधर ही कुणाची ?
चाहूल ही कुणाची ? चाहूल ही कुणाची ?

कशी सत्य उन्हाळी
आषाढीत भिजली ?
स्वप्न पेरायची
स्वप्नं ही कुणाची ?
चाहूल ही कुणाची ? चाहूल ही कुणाची ?

कशी होकार घंटी
नकारात वाजली ?
दैवास मनवणारी
आरती ही कुणाची ?
चाहूल ही कुणाची ? चाहूल ही कुणाची ?

कशी पराजयी मी
विजेती जाहली ?
मज जिंकवणारी
वकिली ही कुणाची ?
चाहूल ही कुणाची ? चाहूल ही कुणाची ?

अशी सुखं न्यारी
कुंकूवाने भरली..
पूर्णत्व देणारी
संपूर्णता ही तुझी..
चाहूल ही तुझी , चाहूल ही तुझी..

- स्वप्ना

RELATED POSTS

0 अभिप्राय