मराठी कविता संग्रह

थांब ना

11:13 Sujit Balwadkar 0 Comments Category :
थांब ना,
डायरीत लिहीलेल्या
ओल्या शब्दांना वाळू दे जरा
डोळ्यात थांबलेल्या
मेघांना ओघळू दे जरा


थांब ना,
भरल्या डोळ्यांनी,
डोळे भरून पाहूदे जरा
सहवासांचे निर्माल्य
लाटांवर वाहूदे जरा

थांब ना,
हा बाहेरचा पाऊस
थांबू दे जरा
आतल्या पावसाला
ओथंबू दे जरा

थांब ना,
निरोप देताना तरी
अलविदा म्हणू दे जरा
उसनं का होईना
ओठांवर हसू आणू दे जरा ...

- उनाड

RELATED POSTS

0 अभिप्राय