MAGIC LIGHT
Photo - Soumitra Inamdar |
समुद्रासमुद्राकडे पाठ करून तुम्ही सगळेच
बुडत चाललेल्या सूर्याकडे पाहणार्या मला पहाल तेंव्हासंध्याकाळचं
नेमकं काय काय बुडत जातं पाण्यातयाची अंधुकशी कल्पना येईल तुम्हालाजसजसा काळोख पाण्याहून खोल होत जातोकाळंशार करत पाणीतळभर उतरू लागतो
तसतसे
पाण्याखालचे मासे
स्वयंप्रकाशित होऊन
रंगीबेरंगी चमचमता
उत्सव सुरू करतात समुद्रतळाशी
तोवर
किनार्यावर उभा असलेला मी
उतरून आलेला असतो खोल
बर्याच पायर्या स्वतःच्या
अचानक कधीतरी पायर्या संपतात
आणि मी न घाबरता बिनदिक्कत
माझं पुढलं पाऊल ठेऊन देतो अज्ञातात
एकेक माणिक मोती दिसू लागतात
येऊ लागते मजा
पायर्याशिवाय उतरत जाण्याची
हळूहळू जाणीव होऊ लागते
आपल्या श्रीमंतीची
मग मी पुन्हा एकदा आख्खी रात्र
खर्च करायला सज्ज होतो
आणि माझ्या चेहर्यावर
कुठलातरी एक
MAGIC LIGHT दिसू लागतो.....
- सौमित्र
0 अभिप्राय