मराठी कविता संग्रह

वगैरे

16:58 Sujit Balwadkar 1 Comments Category : ,पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे

खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या.. विचारी.. वगैरे

बिचारा खरोखर भिकारी निघाला
मला वाटले की पुढारी वगैरे

म्हणा तूच किंमत करावीस माझी ***
तुला शोभते सावकारी वगैरे....

कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो.. जिव्हारी.. वगैरे

अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येत जाते शिसारी वगैरे

तिथे एकटा तोच होता दरिद्री
रुबाबात होते पुजारी वगैरे

अता फक्त होतील भेटी मनांच्या ***
मळभ दाटलेल्या दुपारी वगैरे

असे ऐकले शेवटी न्याय होतो..
पुढे काय झाले "निठारी" वगैरे..?

किती जीवना रोज देतोस धमक्या
दिली का यमाने सुपारी वगैरे

- वैभव जोशी [08 सप्टेंबर 2008]

***सदर ओळी सचिन खेडकर यांच्या काव्य वाचनातून घेतलेल्या आहेत.


Image courtesy: BG Limaye

वैभव जोशी यांच्या इतर कविता -


  1. नेमस्त

  2. पाऊस जीवघेणा

  3. ह्या कशा उबदार ओळी…

  4. इशारे

  5. वगैरे

RELATED POSTS

1 अभिप्राय