चांदणं
चंद्राने टाकले होते अंग तेव्हा
चांदणे टिपूर पडले होते.
चांदण्या बागडत होत्या तेव्हा
चांदणे मधुर हसले होते…
झुळूक वाहिली होती मंद तेव्हा
निशिगंध पसरले होते…
वाकले होते झाड काठावर तेव्हा
त्याला प्रतिबिंब गवसले होते…
तू भेटलीस त्या राती तेव्हा
तृणांवर दवबिंदू उगवले होते…
माझ्या मिठीत विरलीस तू तेव्हा
घड्याळ, क्षणांची नोंद विसरले होते…
.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}
1 अभिप्राय
I,like this poem
ReplyDelete