मराठी कविता संग्रह

औदुंबर

13:20 सुजित बालवडकर 0 Comments Category :

Ashok Naigaonkar

आसमंतात सर्वत्र सल्फरचा गंध
माथ्यावर
संथपणे आकारणारे काळपट ढग
दुतर्फा
गच्च झोपड्यंच्या खोबणीत
मख्ख डांबरी रस्ता

पेट्रोलचा खमंग वास चाखत
जिथे
ड्रेनेजचे महाद्वार
महासागराशी
हितगुज करते
त्या तेजस्वी
काळ्याभोर पाण्यात
औदुंबराचा
पाय फसला


.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}



- वाटेवरच्या कविता, अशोक नायगावकर

RELATED POSTS

0 अभिप्राय