पांडुरंगा
उसवली ओवी फाकला अभंग
ऐशी स्थिती झाली पांडुरंगा ||
अगा येथे झाला तुडुंब अंधार
दिवे गेले तेही दिसेचिना ||
पामरांचे जग रोजची भाकरी
आणिक आयुष्य ढकलती ||
ज्ञानियासी येथे निवृती वेतन
आणिक इतरा फाके होती ||
कोसळले रस्ते तत्त्व धुके झाले
आणीक गोंधळी गाजती हा ||
भुतकाळाऽचेही भूत पाठी येते
आणि वर्तमान सुटले गा ||
दिसे भविष्याला लागलीहे आग
धग धग धऽग चोहीकडे ||
विश्वासाचा सूर्य उजाडेल केव्हा
कासावीस प्राण पांडुरंगा ||
.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}
- वाटेवरच्या कविता, अशोक नायगावकर
0 अभिप्राय