मराठी कविता संग्रह

प्रॉमिस !

00:33 सुजित बालवडकर 1 Comments Category :


Share on Facebook




त्वरित चौकशीचे आदेश दिलेत एवढं एक बरं केलंत , साहेब
काय आहे की चॅनल बदलायलाही थोड कॉन्फिडन्स लागतोच ना ..
मग कसं तो शिवाजी - द बॉस वगैरे बघताना
तुम्हीदेखिल समाजकंटकांशी असेच लढताय वगैरे फील आला पटकन .
शेवटी आमचे शिवाजी तुम्हीच !
बरं त्यात एका तासात काही धागेदोरे हाती आले वगैरेचा बोनस दिलात अन काय
भसाभस नारळी भात ताटात घेऊन तोंडच गोड केलं आम्ही
आजच्या वामकुक्षीवर तुमच्या आश्वासनांची पेंग होती ..
बहीण येणारच होती .. तिचा काय दोष
हातावर धागा बांधणे ही तर श्रध्दा .. तिथे काय विषय काढता !
हां नाही म्हणायला
जपून जा , उशीर झालाय म्हणता म्हणता
आजकाल पुणं तसं राहिलं नाही हे म्हणून टाकलं
तर साहेब
आता प्रॉब्लेम हा आहे की झोप येत नाहीये
"अशा गोष्टी घडणारच " वगैरे टाईप्स एखादी अंगाई गा ना .. प्लीज
उद्या उठून सरळ कामाला लागतो . प्रॉमिस !

- वैभव जोशी

RELATED POSTS

1 अभिप्राय