देश स्वातंत्र्या तुझ्याहुन दूर आला
Share on Facebook

गाढवाला कोकिळाचा सूर आला
राष्ट्रप्रेमाचा अचानक पूर आला
देव व्हावे वाटले दगडास इथल्या
देशभक्तीचा पुन्हा शेंदूर आला
अंतरी ना आग कुठली पेटली पण,
काल विझलेल्या चितांचा धूर आला
जांभई देऊन वदला तो तिरंगा,
दिवस माझा एक क्षणभंगूर आला
पंधरा आगस्ट जितके येत गेले
देश स्वातंत्र्या तुझ्याहुन दूर आला
- अभिजीत दाते
Text & Image courtesy: BG Limaye
0 अभिप्राय