मराठी कविता संग्रह

पागोळीसारखी

18:14 Sujit Balwadkar 0 Comments Category :


Share on Facebook




पागोळीसारखी
झरते उदास
लागून आतली
झड राही..

सावळ्या छायेला
पांघरू ये नभ
आतले मळभ
दाट होई..

दिशा सारवल्या
कालवले सारे
सुहृदाला भूल
दूर नेई..

भिजता पापणी
'पूस' म्हणणारे
जवळ आपूले
कोणी नाही..

- अरूणा ढेरे

Text & Image courtesy: BG Limaye

RELATED POSTS

0 अभिप्राय