मराठी कविता संग्रह

काळोख उतरतो तेव्हा

00:36 Sujit Balwadkar 5 Comments Category :


Share on Facebook
काळोख उतरतो तेव्हा
तळघरात गजबज होते
अटकेत ठेवली ओळ
सुटकेचा कौल उचलते

साखळ्यांतला कल्लोळ
छप्परास जाउन अडतो
परिघास भेदण्याआधी
त्रिज्येच्या पाया पडतो

काळोख उतरतो खोल
त्या तेजोमय उदरात
सन्नाट पसरतो वेगे
कौमार्याच्या रुधिरात

अस्वस्थ शांततेमधुनी
गुरगुरते श्वापद एक
अन पैंजणातुनी कवळे
घुंगरू निखळती कैक

त्या हवेलीतुनी रात्री
सृजनाचा गहिवर घुमतो
बापाच्या दग्ध मनाने
वास्तूचा मालक रडतो

- वैभव जोशी

RELATED POSTS

5 अभिप्राय