मराठी कविता संग्रह

उपाशी फक्त माऊली ती

18:41 Sujit Balwadkar 0 Comments Category :


Share on Facebook

घेतला अखेरचा श्वास
उरले हाती काय होते
खांद्यावरून जाताना हि
पोळले माझे पाय होते

भाऊ होता पुढे
मागे आप्त होते
प्रेत माझे तरी
का अलिप्त होते .....

ताई रडत होती
गुणगान जास्त होते
दोष माझे मात्र
तिथ अव्यक्त होते ....

मी स्वतंत्र तिथे
सारेच बंदिस्त होते
उपाशी फक्त माऊली ती
बाकी व्यंजनात व्यस्त होते

- शब्दवेडा मी

RELATED POSTS

0 अभिप्राय